आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध
स्वराज्य रक्षक
पांडुरंग एकनाथ घोलप रोहोकडी, जुन्नर, जि.पुणे

0
5
1
7
5
8
स्वराज्य रक्षक
किल्ले पुरंदरी जन्मला
तो शिवरायांचा छावा
कार्य किती महान त्यांचे
जरा धांडोळा घ्यावा
पराक्रमाची शर्थ जाहली
स्वराज्य रक्षिताना
कर्तव्यतत्पर राहिले सदा
राज्यकारभार चालविताना
कांगावा झाला मुघलांकरवी
कैद असे जाहले
अपरिमित छळ सोसला
तरी ना पुढती झुकले
असा धर्मवीर झाला नाही
नच पुढती होणार
स्वराज्य रक्षक संभाजी
जयकार अखंड दुमदुमणार
पवित्र त्यांच्या स्मृतीस
नमन माझे मनोभावे
चंद्र सूर्य जोवरी नभी
नाव संभाजी गर्जावे
पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी, जुन्नर, जि.पुणे
===========
0
5
1
7
5
8



