0
4
8
3
0
0
साखरपेरणी
मतलबासाठी करती येथे
सारेच कशी साखरपेरणी
स्वार्थासाठी फक्त चालली
बघा ही उघड बोलणी
कामापुरत्याच सार्यांना
येतात आपल्या आठवणी
गोड गोड बोलून मग
सुरू होते साखरपेरणी
आवळा देऊन हातावरी
काढून घेतात कोहळा
भावनाशून्य होऊन पुन्हा
करतात साजरा सोहळा
साखरपेरणी दिसते हल्ली
इथे प्रत्येक नातेसंबंधात
कोणी कोणाचे नसते
दाखवतात एका क्षणात
हा साखरपेरणीचा खेळ
करतो कडवट नात्याला
सावध असावे क्षणोक्षण
नसावा थारा धूर्त वृत्तीला
पांडुरंग एकनाथ घोलप
ता.जुन्नर, जि.पुणे
0
4
8
3
0
0



