
0
5
4
7
4
5
मराठीचे पुजारी
‘मराठीचे शिलेदार’ आम्ही
गोडवा मराठीचा गातो
मराठीचे सेवाव्रत हाती
अभिमाने शिर उंचावतो
मराठी आमची मायबोली
सुमधुर असे तिची वाणी
शब्दाशब्दातून दडलेली
संस्कृती जपतो मनोमनी
संत ज्ञानेश्र्वर,तुकारामांनी
दिला आहे तिला बहुमान
अभंग गाथा ओव्यामधूनी
गायले मराठीचे गुणगान
कुसुमाग्रजांच्या लेखणीतून
साहित्यतेज उजळले भारी
पु.ल.च्या निखळ विनोदाने
फुलली मराठी भाषा सारी
जपतो वारसा आम्ही इथे
कवी लेखक साहित्यातून
मराठीची सेवा मनोभावे
नित्यनेमे करतो समूहातून
बी एस गायकवाड
पालम, जि.परभणी
=======
0
5
4
7
4
5



