काळी गाय आणि सोन्याची नाणी
बाल लेखिका कु;हर्षिता पाटील, नागपूर
काळी गाय आणि सोन्याची नाणी
एका गावात एक गरीब कुटुंब राहात होते. त्या कुटुंबात एक प्रिया नावाचा मुलगी होती. प्रिया, तिची आई व बाबा असे तिघेच राहात होते. तिच्या आईचे नाव मीरा होते आणि बाबांचे नाव आशीष होते. एके दिवशी प्रिया शाळेत जात असतांना तिला गाय दिसली. गाय काळ्या रंगाची होती. म्हणून तिच्याकडे कुणीही लक्ष देत नव्हते. पण प्रिया खूप चांगली मुलगी होती तिला ती गाय खूप आवडत होती. प्रियालाच नाही तर तिच्या आई बाबांना पण ती गाय खूप आवडत होती. ती रोज गाईसोबत खेळायची. मग तिला घरी परतायला उशीर व्हायचा.
असेच एके दिवशी प्रिया लवकर शाळेत गेली आणि ५.०० वाजता शाळा सुटली तरी ती घरी परतली नव्हती. ती गाईसोबत खेळत होती. प्रिया घरी न आल्याने तिची आई मीरा व बाबा आशीष खूप घाबरले होते. ‘आई बाबा दोघेही प्रियाला शोधायला लांब लांब गेले:. तरीही शोधून न सापडल्याने अजून दूर लांब शोध घेण्यासाठी पुढे गेले. पण मात्र प्रिया कुणालाही सापडली नाही. प्रिया ही गाईसोबत खेळते हे आई बाबांना खरे तर माहितच नव्हते. प्रियाला रात्र झाली कळलेच नाही. ती गायीसोबत खेळथा खेळता तिथेच झोपून गेली. आता रात्र खूप झाली होतो. मग तिच्या आई बाबांनी ठरवले की खूप रात्र झाली आहे; तर प्रियाला आपण उद्या शोधू या.
रडून रडून प्रियाची आई झोपली. परंतु प्रियाच्या बाबांना झोपच येत नव्हती. त्यांनी त्या रात्री शाळेकडे जाणा-या रस्त्याकडे खूष शोधलं. मग प्रिया गाईसोबत झोपलेली त्यांना दिसली. प्रियाला बघून आनंद झाला. पण तिला न उठवता गायीजवळच झोपू दिल. मग काही तासांनी प्रियाला अलगद उचलून घरी नेले आणि तिला तिच्या आईजवळ ठेवले. आशीषरावांना वाटले आता प्रियाच्याआईला आनंद होईल. आता सकाळ झालेली होती आणि मीराला खरच खूप आनंद झाला. एके दिवशी अचानक ती गाय दिसतच नव्हती.
परंतु जिथे ती गायअसायची तिथे अनेक सोन्याची नाणी दिसू लागली होती. गाय न दिसल्याने मग मीरा, आशीषराव व प्रियाने ठरवले की, आधी त्या गाईचा शोध घेतला पाहिजे. आणि त्यांनी शोध घ्यायला सुरूवात खेली, त्यांनी खूप जणांना विचारले, पण गाय काही केल्या सापडत नव्हती. मग त्यांनी शोथता शोथता एक जंगल पार केले. आणि त्या तिघांना तिथे त्यांची गाय सापडली. ती गाय म्हणाली, ” तुम्ही सगळे खूप चांगले आहात”. तुम्ही तिघांनीही माझी खूप काळजी घेतली. म्हणून मी तुम्हाला, तुमचं बक्षीस म्हणून सोन्याची सर्व नाणी देत आहे. आता ही नाणी घ्या आणि गोरगरीबांनामदत करा. आणि त्यांनीही तसेच केल. नंतर ते सुखाने राहू लागले.
बाल लेखिका कु;हर्षिता पाटील,
वर्ग ४ था
हिंगणा रोड, नागपूर



