0
4
8
2
9
0
निसर्ग
सृष्टीचा तो जन्मदाता
निसर्ग हा मित्र खरा
वरदान लाभले हे
निसर्गावर प्रेम करा.
गरजा साऱ्या पूर्ण करी
भागवितो भूक तहान
त्यामुळेच सजीवांना
मिळे सुख समाधान.
हिरवा शालू पांघरूनी
नटली सृष्टी वधू भारी
पक्षी किलबिलाट करी
निसर्गाची किमया न्यारी.
सर्वांनी जपून ठेवावा
निसर्गाचा अमूल्य ठेवा
मनोभावे त्याला जपा
देई भरभरून मेवा.
वृक्ष लावा वृक्ष जगवा
शुद्ध ताजी मिळेल हवा
करू नका हो प्रदूषण
जागा हो आता मानवा.
दीपककुमार सरदार
तालुका लोणार जिल्हा बुलढाणा
=========
0
4
8
2
9
0



