
0
5
1
7
9
5
धाक तो धाक
धाक तो धाक..
नसावा केवळ कायद्याचा..
असावा आत्मआवाजाचा..
दिल्या घेतल्या वायद्याचा..
धाक तो धाक…
फक्त नकोय लिखित कलमांचा
हवाय सक्त नैतिकतेचा
सामाजिक बांधिलकीचा
सत्यनिष्ठ आदर्श आचरणाचा..
धाक तो धाक.. हवा..
वडिलधासार्या थोरा मोठ्यांचा
आदरणीय गुरूजनांचा..
सभ्यता आणि सुसंस्कारांचा..
धाक तो धाक खरा…
सारासार विवेकबुद्धीचा..
विचारी कठोर संयमाचा..
वेळीच अधःपतन रोखण्याचा..
धाक तोच धाक खरा..
ठरतो करारी नजरेचा..
भक्कम पोलादी मनगटाचा..
दुष्ट दुर्जनांच्या मर्दनाचा…
विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
0
5
1
7
9
5



