कविताखानदेशनागपूरविदर्भसाहित्यगंध
विनादप्तर शाळा; गणेश पाटील
0
4
8
3
0
0
विनादप्तर शाळा
आला आनंददायी शनिवार
भरली विनादप्तर शाळा।
नाही पाठीवर दप्तराचा भार
जमला सारा विद्यार्थ्यांचा मेळा।।१।।
पटांगणावर करा सकाळी योगा
जीवन आरोग्यदायी भोगा।
कवायती करा छान छान
कसरतीनं होई अंगाची शान।।२।।
चार भिंतीच्या बाहेर पडू
निसर्रगाशी एकरूप होऊ।
काड्या पेट्यातूनी गणित शिकू
पाना फुलातूनी विज्ञान पाहू।।३।।
रिंगण करा गोल गोल
शिक्षकांसह गाणी शानदार।।
कथा ऐकू छान छान
कविता गाऊ मजेदार।।४।।
विनादप्तर शाळा भरली
नवनव कल्पना स्फुरली।
शाळेत परसबाग फुलली
शनिवारची सकाळ बहरली।।५।।
आनंददायी रम्य सकाळ
शाळेत सारे बालगोपाळ ।
पटांगणी बहरला ज्ञानाचा मळा
खो-खो लगोरी खेळ खेळा।।६।।
गणेश नरोत्तम पाटील
ता.शहादा,जि.नंदूरबार
=============
0
4
8
3
0
0



