0
4
8
2
9
7
भिंतीआड
ए…काय रे आठवतं तुला…?
आपण लपाछपी खेळायचो
कधी दरवाज्याच्या पाठीमागे
तर कधी भिंतीआड दडायचो
किती गंमत होती ना जगण्यात
लपलेले…भिडू गडी शोधण्यात
ते हरणे जिंकणे होते लुटुपुटीचे
क्षण वेचत होते सारे आनंदाचे
आज मात्र सारेच हरवलेले इथे
आपल्याच विश्वात स्व-कोषात
पैसा गाडी बंगला नोकरचाकर
सारं सारं काही हात जोडून उभं
पण भिंतीआडून खुणावतयं सुख
मी तिथे नाही आहे….
मी इथे आहे… मायेच्या स्पर्शात
ओथंबलेल्या नजरेच्या जळात
पण धूसरच झाले आता सारे…
भिंतीआड अश्रू ढाळणे हेच प्राक्तन खरे
वैशाली अंड्रस्कर,चंद्रपूर
=================
0
4
8
2
9
7



