0
4
8
2
9
4
भाषेची श्रीमंती
परस्पर संवादाचे
प्रभावी माध्यम भाषा
भाषेचा गोडवा टिकू
द्यावा हीच अभिलाषा ॥
शुध्द आचाराने वाढे
विचारांची बहुगती
समृध्दीची खाण असे
मराठी भाषा संपत्ती ॥
भाषेची श्रीमंती वाढे
व्याकरण प्रयोगाने
मराठी भाषेचा करु
गौरव अभिमानाने ॥
भाषेमध्ये माधुर्याची
गोडी जाणविते फार
वक्तृत्व,भाषणातुनी
करु भाषेचा प्रसार ॥
धन्य झालो मराठीचे
शिलेदार आज आम्ही
भाषेची श्रीमंती काव्य
स्तवनास संधी नामी ॥
दत्ता काजळे (ज्ञानाग्रज)
तुरोरी जि.धाराशिव
0
4
8
2
9
4



