
0
6
3
0
9
4
रानातली शाळा
एकदा रानात भरली शाळा
हत्तीच्या पाठीचा केला फळा
शाळा झाली सुरू
माकडं लागली उड्या मारु
त्यांना म्हणाला ससा
गप्प बसा गप्प बसा
माकडं म्हणाली हूप हूप
सशा सशा बस चूप
चिंगी म्हणाली,नका असे भांडू
‘प्रेमाने सारे एकत्र नांदू’
पोपट म्हणाला,मिठू- मिठू
चिंगीचे म्हणणे लागले पटू
इतक्यात गाढवाने घेतली तान
फारच छान फारच छान
भुमेश्वरीताई सातपुते- खोंडे
ता. उमरेड जि.नागपूर
0
6
3
0
9
4



