
0
5
1
6
4
1
सगळेच व्यस्त
जलदिन साजरा करूनिया
सांगा बरं मिळेल का पाणी
पाण्यासाठी तडफडून मेला
कावळ्याची नवी कहाणी…!!
वासरासाठी हंबरणारी ती
चित्रातच उरली तांबू गाय
खिलारी सर्जा राजा आता
शोधून सुद्धा सापडत नाय..!!
विहिरीवर लटकणारा खोपा
नि सुगरणीची ती पिल्ले
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्येही
नदीकाठी रेतीचीच किल्ले…!!
सुरपारंब्याचा सुट्टीत खेळ
आजोळीचा आनंद निर्भेळ
तासंतास मोबाईल हातात
लहान मुलांना कुठंय वेळ??
इथून तिथून सगळे व्यस्त
कोण काय करतंय कळेना
कोणासाठी कोणाला बघा
थोडा कसा वेळ मिळेना.!!
राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जिल्हा बीड
0
5
1
6
4
1



