Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणे

‘आईचे हळवे मन’ पुस्तक प्रकाशन सोहळा

वसुधा वैभव नाईक, पुणे

0 4 8 2 9 0

आईचे हळवे मन’ पुस्तक प्रकाशन सोहळा

वसुधा वैभव नाईक, पुणे

पुणे: ‘वसुधा फाऊंडेशन’ आयोजित माय मराठी राज्यस्तरीय कवी संमेलन व ‘वसुधा फाऊंडेशन’ संस्थापिका मा.सौ.वसुधा नाईक यांच्या “आईचे हळवे मन” या लघुकथा संग्रहाचे पुस्तक दि. 18/04/2025 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन कॉर्नर, पुणे येथे प्रकाशन झाले.

ज्येष्ठ साहित्यिक मा.वि.ग.सातपुते , ज्येष्ठ साहित्यिक डॉ.मधुसूदन घाणेकर, आधुनिक बहिणाबाई मा.विमलताई माळी, मा.जयप्रकाश झेंडे तसेच युवा गझलकार मा.गिरीश जंगमे, राजयुवा प्रकाशनाचे प्रकाशक मा.गौरव पुंडे तसेच वसुधा नाईक यांच्या परिवाराच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. तसेच या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने झाली.सौ. वसुधा नाईक यांच्या कन्या कोमल, शीतल तसेच नात सोनाक्षी यांनी गणेश वंदना उत्तम सादर केली.

या वेळी महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून आलेल्या 52 कवींनी आपल्या कविता सादर केल्या तसेच रसिक मनाची मने जिंकली. तसेच आलेल्या सर्व कवींचे अक्षरधन, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.मधुकर्णिका सारिका सासवडे यांनी बहारदार केले. दीपाराणी गोसावी हिने मस्त रांगोळी काढून सजावट केली. मृण्मयी काळे या 12 वर्षीय बालिकेने स्त्री भ्रूण हत्या या वर एकपात्री उत्कृष्ट नाटक सादर करून रसिकांची मने जिंकली.

या सर्व कार्यक्रमाचे आयोजन गौरव पुंडे, योगेश हरणे,श्रीराम घडे,पल्लवी पवार,मयुरी लायगुडे,तुषार पालखे यांनी उत्तम असे केले.सर्व टीमने कार्यक्रम अतिशय उत्तम केला. नातलग, मित्र परिवार मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होता.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे