0
4
8
2
9
7
मागे वळून बघू नको
आयुष्यात संधी मिळेल तुलाही,लगेच खचून जाऊ नकोस,
प्रेम तुझ्यावर करणारे,आम्ही सर्वजण आहोत,
तुझ्यासाठी लढणारे आम्ही सर्वजण आहोत,
अरे कधीतरी स्वतःसाठी तू ही थोड हसुन बघ,
उठ आणि नीट डोळे उघडून बघ,
प्रत्येकाच्या आयुष्यात कितीतरी संघर्ष आहे,
नाही नाही म्हणून,उगाच तू कुढत बसु नकोस,
बळ आहे तुझ्या मनगटात,स्वप्ने डोळ्यात घेऊन चल,
परिस्थितीशी भिडवून दोन हात करत चल,
विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघु नकोस,
आयुष्य खुप सुंदर आहे,
मागे वळून बघू नकोस,
मागे वळून बघू नकोस……
सुजित वाघमारे
चेरा,लातूर
0
4
8
2
9
7



