Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरमहाराष्ट्रविदर्भ

जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची होणार नेत्र तपासणी

रजत डेकाटे- प्रतिनिधी

0 6 3 3 7 0

जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची होणार नेत्र तपासणी
‎
‎सुधीर पारवे फाउंडेशन व लक्ष्मणा बहुउद्देशीय संस्थेचा पुढाकार; गरजू विद्यार्थ्यांना चष्म्यांचे वाटप
‎
रजत डेकाटे- प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज मिडीया

‎भिवापूर : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करून नेत्रविकार आढळणाऱ्या विद्यार्थ्यांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून उपचार करण्यात येणार आहेत. तसेच तिरळेपणाचा त्रास असलेल्या विद्यार्थ्यांवर योग्य उपचार आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्याचा संकल्प माजी आमदार सुधीर पारवे यांनी केला आहे.
‎
‎सुधीर पारवे फाउंडेशन तथा लक्ष्मणा बहुउद्देशीय संस्था, भिवापूर यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या नियोजनासाठी  पंचायत समिती सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीला सहाय्यक गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालय भिवापूरचे वैद्यकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी, विशेष शिक्षक तसेच भिवापूर, नांद, जवळी व सोमनाळा येथील आरोग्य अधिकारी आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे अधिकारी उपस्थित होते.
‎
‎सध्याच्या काळात ऑनलाइन अभ्यासक्रम, इंटरॲक्टिव्ह बोर्ड, संगणकीकरण आणि आधुनिक शैक्षणिक प्रणालींचा वापर वाढला आहे. त्यातच विद्यार्थ्यांचा मोबाईलचा वाढता वापर लक्षात घेता त्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करून संभाव्य नेत्रविकारांचे वेळीच निदान करण्यावर भर देण्यात येणार आहे.
‎
‎तपासणीदरम्यान दृष्टीदोष किंवा तिरळेपणा आढळून आल्यास संबंधित विद्यार्थ्यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य उपचार उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच गरजू विद्यार्थ्यांना सुधीर पारवे फाउंडेशन आणि लक्ष्मणा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून चष्म्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
‎
‎विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना शैक्षणिक प्रगती करताना दृष्टीदोषामुळे अडचणी येऊ नयेत आणि वेळेत उपचार मिळावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 3 3 7 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे