Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरनागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

काही नाही…

विष्णू संकपाळ बजाजनगर

0 4 8 2 9 3

काही नाही…

कांही नाही म्हणून,
लपत नसत घडलेलं
कसं सांगावं कुणास,
मन कुणावर जडलेलं..//

काळजाच्या कप्प्यात,
असतं कांही दडलेलं
त्यासाठीच तर मन हे
सदैव चिंतेत पडलेलं..//

अशाच एका वळणावर,
कुणीतरी छेडलेलं
आणि त्याच्याच विचाराने
अहोरात वेढलेलं…

खूप वाटतं त्याच्यावाचून,
जेथे तेथे अडलेलं
एकांतात त्याच्यासाठीच,
हळवे मन रडलेलं..//

त्याच्या भास आभासात,
मनपाखरू उडलेलं
त्याच्या शोधासाठीच
तर पंख पंख झडलेलं..//

विष्णू संकपाळ बजाजनगर
छ. संभाजीनगर
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे