0
4
8
2
9
7
लेक
लेक प्रेमाचा जिव्हाळा
लेक मायेची फुंकर
साऱ्या कुटुंबाची असे
परी लाडकी सुंदर.
सांभाळते घरे दोन्ही
तेच माहेर सासर
भावासारखाच उभा
राही खंबीर भास्कर.
मायबापा ती लाडकी
हास्य पाही गालावरी
दुःख होईल हलके
शीण आला कितीतरी.
सदा समजुनी घेई
किती कामाचाच व्याप
म्हणे कुणाच्याही आता
नको हा डोक्याला ताप.
मोनू, सोनू अन् दिदी
नांव येई ओठावर
जेव्हा जाई ती सासरी
सुने वाटतेया घर.
दीपककुमार सरदार
तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा
===========
0
4
8
2
9
7



