Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरनागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

डागडुजी

विष्णू संकपाळ बजाजनगर

0 4 8 2 9 7

डागडुजी

नात्यागोत्यांचा इमारतीची
डागडुजी ही करावी लागते
सांत्वनाचा मृदू मलम लावून
खोल जखम भरावी लागते… //

हितशत्रूंच्या उंदीर घूशींची
वाट वेळीच रोखावी लागते
यांनी पाडलेली छिद्रे शोधून
त्यात पाचर ठोकावी लागते… //

गैरसमजाच्या जळमटांची
जाळी काढून फेकावी लागते
संशय कल्लोळाची विषवल्ली
जागच्या जागी ठेचावी लागते… //

स्वार्थ, असूया, मतभेदांच्या
झरोक्यांना मिटवावे लागते
येथे मनभेदांना वाव देणार्‍या
तडा, भेगांना बुजवावे लागते… //

सामोपचाराच्या झाडू पोचाने
साफ सफाई ठेवावी लागते
वाद विवाद अन् कुरघोडीच्या
कचर्‍याची वाट लावावी लागते… //

विष्णू संकपाळ बजाजनगर
जि.छ. संभाजीनगर
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे