कराडच्या ‘आई’ अनाथ आश्रमात देहव्यापार; महिलेसह दोघांना अटक
चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने वेशाव्यवसायाचा गोरखधंदा
कराडच्या ‘आई’ अनाथ आश्रमात देहव्यापार; महिलेसह दोघांना अटक
चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने वेशाव्यवसायाचा गोरखधंदा
जिल्हा प्रतिनिधी सातारा
सातारा: कराड तालुक्यातील टेंभू या गावातील ‘आई’ अनाथ आश्रमात देहव्यापार करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका अनाथाश्रम चालक महिलेसह दोघांविरोधात कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिली. या प्रकरणात वाल्मिक महादेव माने रा. म्हासोली, ता. कराड याच्यासह आश्रम चालविणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केले आहे.
सामाजिक बांधिलकीच्या नावाखाली आश्रमामध्ये आश्रयासाठी आलेल्या महिलेला मारहाण करून देहविक्री करण्यासाठी भाग पाडले असल्याची तक्रार एका महिलेने कराड पोलीसात केली होती , एवढेच नव्हे तर ही महिला अनाथ मुली व महिलांना या आश्रमात आश्रय देण्याच्या नावाखाली आणायची व त्यानंतर त्यांना शारीरिक मानसिक त्रास देऊन देहविक्री करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप एका तक्रारदार महिलेने केलेला आहे.
कराड तालुका हा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील मध्यवर्ती तालुका म्हणून ओळखला जातो या तालुक्यात खेड्यापाड्यातून लोक नोकरीच्या निमित्ताने येत असतात . या ठिकाणी धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली असून कराड तालुक्यातील टेंभू येथील आश्रमामध्ये गतीमंद मुलीकडून आश्रम चालक महिला पाय दाबायला लावत असल्याचं व्हिडिओत समोर आलेल आहे. तसंच ह्या गतीमंद मुलीनं जर सांगितलेलं काम ऐकलं नाही तर मारहाण करत असल्याचं व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे, एवढेच नव्हे तर आश्रम चालक महिलेच्या स्वयंपाक घरामध्ये चक्क दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचं समोर आलंय यात एक मुलगी पाण्याच्या हंड्यातून दारूच्या बॉटल घेऊन त्या पॅक बरणीमध्ये ठेवत असल्याचं दिसत आहे.
आई चॅरिटेबल ट्रस्टच्या चालवणारी ती महिला चित्रपट सृष्टीत संधी देण्याचे बहाण्याने मुलींना जाळ्यात ओढून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडते एवढेच नव्हे तर हैदराबाद ला देखील अनेक मुलींना चित्रपटात काम देते म्हणून पाठवण्याचा धंदाच सुरू केला असून या रॅकेटच्या माध्यमातून लाखो रुपये कमवत असून आजवर तिनें पक्षाचे पदाधिकारी, वकील,पोलीस अधिकारी यांना देखील सोडलं नाही संबंधित महिलेकडून पोलीसांना हप्ते देत असल्याने कारवाई होत नसल्याची कराड परिसरात चर्चा सुरू आहे.
कराड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्या महिलेशी संपर्क साधून साताऱ्यात गाडी पाठवून बोलावून घेऊन तक्रार दाखल केली. एवढेच नव्हे तर संबंधित महिला व तिच्या साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली याबाबतीत कराड तालुका पोलिस आता अधिक तपास करत आहेत.



