अलिबागकविताकोकणपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध
अजूनही तिथेच मी
श्री.पांडुरंग एकनाथ घोलप रोहोकडी, ता. जुन्नर, जि. पुणे
0
4
8
2
9
3
अजूनही तिथेच मी
भेट तुझी माझी झाली
उभा अजूनही तिथेच मी
वाट पाहूनी थकलो जरी
येशील विश्वास ठेवतो मी
माझे प्रेम स्विकारून
आता कुठे दूर गेलीस
शोधू कुठे सांग तुला
का अवहेलना केलीस
किती पाहू वाट तुझी
डोळ्यात आसवांची धार
झुरत राहिलो मी फक्त
का घेतलीस तू माघार
तीच जागा,तोच मी
पण कुठे आहे तीच तू
आस तुझी,भास तुझा
कळू लागला तुझा हेतू
अजूनही तिथेच मी
झालीस जरी तू फितूर
उध्वस्त अपेक्षा तरी
वाट पाहतो मी आतूर
श्री.पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी, ता. जुन्नर, जि. पुणे
0
4
8
2
9
3



