Breaking
ई-पेपरकवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

उंदराची टोपी

मीनाक्षी काटकर

0 4 8 2 9 3

उंदराची टोपी

उंदीरमामा गेले फिरायला
मुंबईच्या मोठ्या बाजारात 
उंच इमारती पाहत पाहत
गाणी होते गुणगुणत

बाजारात दिसला गोपी
त्याच्याकडे होती टोपी
उंदीरमामाने दिली अत्तराची कुप्पी
लाडाने घेतली त्याने पप्पी

उंदीरमामाला हवी टोपी
युक्ती सुचली त्याला सोपी
म्हणाला चल रे गोपी
खेळू आपण लपाछपी

गोपी पळाला जोराने
टोपी उडाली हवेत
पकडण्यासाठी उंदीरमामाने
उडी मारली जोरात

टोपी पडली डोक्यावर
उंदीर पडला खोक्यावर
पाय पडला बोक्यावर
बोक्या गेला झोक्यावर

मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे