0
4
8
2
8
6
समाधान
समाधान मानलं तरच
समाधान मिळत असतं,
धन पुन्हा मिळवण्याची
हाव करायची नसते.
अदानी – अंबानी देखील
समाधानी दिसत नाही,
नेता पंतप्रधान झाला तरी
समाधान मिळत नाही.
गरजा कमी असाव्या
समाधानी राहण्यासाठी,
समाधान मानण्याची
इच्छा हवी त्यासाठी.
जेवढं येतं वाट्याला
तेवढंच मिळत असतं,
संपले इथे श्वास की
निघून जायचं असतं.
पशु–पक्षी, झाडांना
पर्वा नसते समाधानाची,
अपेक्षा वाढल्या की वाट
लागते समाधानाची.
डॉ. बालाजी राजूरकर
हिंगणघाट जि. वर्धा
0
4
8
2
8
6



