सालेशहरी पुनर्वसन येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा
रजत डेकाटे, प्रतिनिधी
सालेशहरी पुनर्वसन येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा
रजत डेकाटे, प्रतिनिधी
कारगाव/ मालेवाडा : (दि २३) भिवापूर तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्प बाधित सालेशहरी पुनर्वसन येथे नवयुवक उत्सव मंडळाच्या वतीने तान्हा पोळाचे आयोजन करण्यात आले.
यात सालेशहरी व सालेभट्टी या दोन्ही गावातील तब्बल 50 बालगोपाळांनी तान्हा पोळ्यात सहभाग घेतला होता. मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. बालगोपाळांनी आपल्या नंदीबैलाला उत्कृष्ट सजवून तान्हा पोळ्यात आणले. आग्यश्री सोनटक्के यांच्या उत्कृष्ट सजविलेल्या नंदीबैलाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन तर द्वितीय पारितोषिक स्वास्तिक बागडे व तृतीय बक्षीस साक्षी दुपारे यांना नवयुवक तान्हा पोळा समितीच्या वतीने देण्यात आले.
तान्हा पोळ्यानिमित्त नागरिकांकडून अनेक प्रकारच्या झळत्या घेण्यात आल्या. भिवापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती व कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णाजी घोडेस्वार यांनी आपल्या मनोगतातून बैलपोळ्याचे महत्व पटवून सांगितले. घोडेस्वार इतक्यावरच राहिले नाही तर ते म्हणाले की बळीराजाच्या या सख्याबद्दल आपण नेहमी आदर आणि कृतीतून त्याच्यावर प्रेम करावे असे आपल्या मनोगतातून त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक फुलचंद ठाकूर यांनी केले तर आभार सामाजिक कार्यकर्ते सचिन सालोरकर यांनी मानले. यावेळी मंचावर उपसरपंच प्रकाश गुरपडे, देवेंद्र देशमुख ,नथू कुकडे ,पृथ्वी मासुरकर प्रतिभा रडके ,रेखा गुरपडे (ग्रां.प.सदस्य), माजी उपसरपंच धर्मेंद्र देशमुख पोलीस पाटील प्रशांत घोडेस्वार, आशा सेविका निरंजना नाईक,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुण बनकर,उत्तम रडके,गजानन सायरे, धनराज रडके,विकी सहारे,आकाश खोकले,धीरज सोनटक्के,महेश ठाकूर, प्रवीण खोकले,रामचंद्र भोयर आदी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





