0
4
8
2
9
7
विध्वंसक
खरं सांगते बाळांनो
शिकवावेसे खूप वाटते
सर्वांगिण विकास व्हावा तुमचा
प्रत्येक शिक्षकाला मनापासून वाटते ॥
काय करावे कळत नाही
रोजचेच येतात पत्र
राजा बोले दळ हले
हुकुमाचे ताबेदार कर्मचारी मात्र ॥
कधी म्हणतात झाडे लावा
कधी स्वच्छता पंधरवाडा राबवा
मध्येच येते आयगॉट प्रशिक्षण
कधी उल्हास कधी अमृत ॲप भरण ॥
झाडे तोडलीत त्यांनी
बनून विध्वंसक पर्यावरणाचे
सेल्फी पुरावे भरता भरता
पणाला लागले भविष्य विद्यार्थ्यांचे ॥
चोवीस तास पुरत नाहीत
ऑनलाईन माहिती भरतांना
भविष्य तुमचे बिघडवणार नाही
एक शिक्षक म्हणून जगतांना ॥
सरला टाले
राळेगाव यवतमाळ
=========
0
4
8
2
9
7



