Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

सामाजिक कार्यकर्ते ‘नामदेव तांबडकर’ यांचा ८० वा वाढदिवस उत्साहात साजरा

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 5 1 6 5 2

सामाजिक कार्यकर्ते ‘नामदेव तांबडकर’ यांचा ८० वा वाढदिवस उत्साहात साजरा

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबाग/ सुडकोली (ता. २) सेवानिवृत्त सहाय्यक दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क व सामाजिक कार्यकर्ते श्री. नामदेव पांडुरंग तांबडकर यांचा ८० वा वाढदिवस (सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा) १ मार्च रोजी सर्वोदय विद्यालय सुडकोलीच्या पटांगणावर साजरा करण्यात आला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक, राजकीय व शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व सहकारी, सेवानिवृत्त संघटना व जेष्ठ नागरिक संघटना, रामराज विभागातील पदाधिकारी व सदस्य, विद्या विकास मंडळ सानेगावचे पदाधिकारी, ग्रुप ग्राम पंचायत सूडकोलीचे आजी-माजी सरपंच व सदस्य, ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रमंडळ व आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थितांनी श्री. नामदेव पांडुरंग तांबडकर यांना शाल, श्रीफळ देऊन शुभेच्छा देताना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. ८० व्या वर्षी देखील त्यांचा उत्साह, काम करण्याची पद्धत व जिद्द, समाजसेवेची आवड याचे कौतुक केले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे श्री. कांबळे, श्री. सुधाकर पाटील, एस. आर. पाटील – रायगड जिल्हा बँकेचे माजी संचालक श्री. अनंत पाटील, रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य व विद्या विकास मंडळ सानेगावचे अध्यक्ष नंदू म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते मोहन धुमाळ, सुरेश ठाकूर, शिवदास काटकर, सेवानिवृत्त संघटना अध्यक्ष नारायण भोईर, जेष्ठ कन्या दर्शना म्हात्रे, नातू डॉ. संकेत म्हात्रे, कु. सक्षम तांबडकर यांनी मनोगत व्यक्त केले तर प्रमोद टावरी व तुळशीराम पाटील यांनी वाढदिवसाचे गीत गायन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दत्ताराम म्हात्रे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुलगा वैभव व कुटुंबीय, कुलस्वामिनी ग्रुप कोपर, गणेश सेवा मंडळ व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

2/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 5 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे