0
4
8
2
9
4
शिल्पकार
भारतीय राज्यघटनेचा
शिल्पकार भीम होता,
समता,स्वातंत्र्य,बंधुता
न्याय,हक्क,दाता होता…१
रंजल्यागांजल्या जीवा
आधार भीम तो होता,
भवितव्य उलगडणारा
मनकवडा भीम होता…२
वादळ वाऱ्याशी झुंज
देण्या माझा भीम होता,
वादळात जीवन नौका
तारणारा नावाडी होता…३
गुलामीच्या जोखडातून
सोडवणारा भीम होता,
मूलभूत हक्क, कर्तव्य
रुजवणारा भीम होता…४
मुक्याचीही वाणी आहे
आंधळ्याचे डोळे होता
अज्ञान,अंधकार जिवनी
ज्ञान ज्योत तेवत होता…५
बी एस गायकवाड
पालम, परभणी
0
4
8
2
9
4



