Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजीनगरमराठवाडासाहित्यगंध

प्रतिभावंत

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर

0 5 9 6 9 7

प्रतिभावंत

निखळ स्पर्धा म्हणजेच
जणू आत्म्याचा आवाज
आतल्या कला गुणांचा
व्हावा बाहेरून आगाज.. //

स्पर्धेच्या अग्निदिव्यातून
जे निघे तावून सुलाखून
तेच ठरतेय अस्सल सोने
जे घ्यावे पारखून निरखून.. //

जिंकणाऱ्याला जग म्हणे
हा होताच खूप भाग्यवंत
खरे तर तो विजेता ठरतो
येथे खराखुरा प्रतिभावंत… //

कुणी म्हणतात बलवत्तर
हस्तरेषा आणि ग्रहदशा
श्रेष्ठ ठरतो कर्म सिद्धांत
जो देतो जीवनास दिशा.. //

नको तकलादू कुबड्या
नको शिफारसी बेगड्या
खर्‍या प्रतिभावंतासमोर
यशच घालते पायघड्या.. //

विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 6 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे