0
4
8
2
9
0
इच्छाशक्ती
ज़िद्द आणि चिकाटी सोबतच
असावी, प्रबल इच्छाशक्ती,
कठोर परिश्रमाची, करा वी तयारी
अभ्यास हीच,विद्यार्थ्यांची शक्ती.
विचलीत करू नये स्वतःला
काबू ठेवावा,आपल्या मनावर,
विशाल ध्येय ठेवून मार्ग चालावा
तरच रहाल,जगात एक नंबर.
खाच खळगे, दगड गोटे
स्वतःच,बाजूला काढावेत,
यशोशिखरावर चढताना
अमर्याद,क्षितिजाला घ्यावे कवेत.
अशक्य तें शक्य करावे
मेहनत,आणि चिकाटीने,
नभी उत्तुंग, घ्यावी भरारी
ज्ञान विज्ञानाच्या, बळाने.
परीक्षा तुमची पहायला
काटेकुटे पसरलीआहेत रस्त्यात,
त्यावर चालण्याची ठेवा तयारी
हिंमत हारू, देवू नका मनात.
मायादेवी गायकवाड
मानवत परभणी
==========
0
4
8
2
9
0



