Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखविदर्भसाहित्यगंध

सौंदर्यवान रुपाली

कुसुमलता दिलीप वाकडे दिघोरी रोड, नागपूर

0 4 8 2 9 0

सौंदर्यवान रुपाली

दिवसामागून दिवस जात होते. तसे म्हटले तर, रुपाली म्हणते, ‘मी लहानच होते, पण आईवडीला करीता मी मोठी भासू लागले’. आणि माझी व मयूरची भेट झाली ती थेट माझ्या लग्नातच. तीन वर्षांनंतर आता मलाही समजू लागलं आता लहान मुलीसारखं वागून चालणार नाही. या तीन वर्षांत मयूर आपल्या मामाकडेच बंगलोरला होता व मामा एका व्यापाऱ्याकडे नोकरीला होते. मयूरला सातवी पासून मामा घेऊन गेले होते. मास्तरांची ही अशीच इच्छा होती तीन वर्ष मयूर बंगलोर लाच होता पण दुर्दैवाने शेवटी इंग्लंडला पाठविण्याच्या ऐन परीक्षेच्या वेळी तो आजारी पडला .दुसरी मुले निवडून आलीत.याचा पहिला नंबर असून दोन वर्ष त्याला स्वस्थ बसावे लागले. माझ्या लग्नाच्या नुकताच पाच दिवस आधी आला होता. त्याने पुण्यात एक वर्ष शिकून, मुंबईच्या व्यापारी काॅलेजात शिक्षण घ्यावे व नंतर इंग्लडला जाण्याचा त्याचा विचार होता.

मयूर बंगलोरहून आला त्यानंतर त्याची व माझी पहिली दृष्टादृष्ट झाली, त्या वेळी मी पुजा करीत होते. मामी व मास्तर दोन दिवस आधीच घरी आली होती. पण मयूर काहीतरी निमित्य सांगून आपल्याच काॅलेजच्या मित्राकडे डेक्कनला थांबला होता. माझे लग्न थाटात झाले. कारण नुकताच अप्पाचा पगारवाढ झालेला होता. लग्नाच्या दिवशी सकाळीच तो आला आणि थेट देवघरात येऊन माझ्यापाशी उभा राहिला. मी आपली खाली पाहून देवाला हळदीकुंकू वाहत होते. कितीतरी वेळ मयूर माझ्याकडे सारखा पाहत होता. मलाही कसे तरी वाटायचे चोहीकडे लग्नाचे घर म्हणून गर्दी चालली होती.आता काय बरे म्हणेल मला हा ? मनात विचारांचा गोंधळ सुरू होता पण मयूर काहीच बोलला नाही जाण्यासाठी वळताच मी त्याच्याकडे पाहिले तो हातातील रूमालाने डोळे पुसत निघून गेला. मामीच्या पाऊलांची चाहूल लागताच मी सुध्दा आलेल्या अश्रूचा मार्ग थांबविला.

लहानपणी जे वाटते ते पूर्ण होत नसते. पण इच्छा संपूर्ण पूर्ण होत नाहीत. जे आईवडीलासमोर बोलायला पाहिजे ते आमचे मुख कधी उघडताच आले नाही.मला एका श्रीमंत घराण्यात देण्यात आले चुलत मामाजी डेप्युटी कलेक्टर, सख्खे मामाजी सरकारी दवाखान्यात असिस्टंट, आमची स्वारी डेक्कन काॅलेजला,दोन हजार रूपये हुंडा दिला. मुलामुलींचा पत्रिका जुडली होती. कुलीन घराणे,दागिने भरपूर, मयूर काय तर, एका शाळामास्तरांचा मुलगा मुलीला सुख हवे असल्यास घराणे बघावेच लागते.ह्रदय जुडली नसली तरी चालेल.

मयूरचा आणि तिकडचा स्नेह फार होता. आता लग्नाला तीन वर्ष झालीत सर्वाचा स्वभावगुण कळून चुकले. आई म्हणायची, ‘मुलगी जास्त मनाला लावून घेते, पण आता खऱ्या सुखाची अपेक्षा करू नये’. मयूर सासरी स्नेहपोटी एखादे वेळेस येई. तो मुंबईत व्यापारी काॅलेजात होता.तो पुण्यात येई मी तिथे असले तर आठ आठ दिवस राहायचा. मी मोकळेपणाने त्याच्याशी फारशी बोलत नसे. कुणी जर लग्नाचा विषय काढला, तर तो तिथेन निघून जाई. मामी व मास्तरांचाही सासरी घरोबा बराच होता. तरी श्रीमंत व गरीब हा फरक होताच मला जे काही पाहिजे ते सासरी मिळाले नाही याचे शैल्य बोचायचे. ( क्रमशः )

कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, नागपूर
======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे