Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनगोंदियानागपूरमहाराष्ट्रविदर्भ

न्यु मून स्कूलमध्ये फटाके विरहीत दीपोत्सव साजरा

तारका रूखमोडे, जिल्हा प्रतिनिधी

0 4 8 2 8 6

न्यु मून स्कूलमध्ये फटाके विरहीत दीपोत्सव साजरा

पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन

तारका रूखमोडे, जिल्हा प्रतिनिधी

अर्जुनी/ मोरगाव: शहरातील न्यु मून इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर काॅलेज मध्ये दिवाळीच्या पूर्वपर्वावर ‘दीपोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. (दि.२८ऑक्टो.) रोजी आयोजित या कार्यक्रमाला शाळा समितीचे सचिव ओमप्रकाशसिंह पवार, व्यंकटेश खोब्रागडे, प्राचार्य.राकेश उंदीरवाडे, प्रा.तारका रुखमोडे तसेच विद्यार्थ्यांसह शिक्षक उपस्थित होते.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शाळेची सजावट आकर्षक रांगोळ्या ,दिवे आणि फुलांच्या तोरणांनी करण्यात आली होती.विद्यार्थ्यांनी स्वहस्ते तयार केलेले आकाशकंदील, लामणदिवे, पणत्या सजावट करून आणलेल्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात लक्ष्मीमाता- गणेश यांच्या फोटोचे पुजन व दीप पूजन करून करण्यात आली. सचिव ओमप्रकाशसिंह पवार यांनी उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा देत सणाचे महत्त्व स्पष्ट केले आणि भारतीय संस्कृतीत त्याचे स्थान यावर मार्गदर्शन केले.

प्रा.उंदिरवाडे यांनी विद्यार्थ्यांना दिवाळी सणामागील पौराणिक संदर्भ आणि सामाजिक महत्त्व समजावून सांगितले.व शुभेच्छा दिल्या.प्रा.तारका रुखमोडे यांनी फटाके न फोडता प्रदुषण विरहीत दिवाळी साजरी करावी व पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन केले.अध्यापिका त्रिवेणी थेर व प्रतीक्षा राऊत यांनी दिपावलीच्या पाचही दिवसांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.

कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे फटाके ऐवजी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा विद्यार्थ्यांना संदेश देण्यात आला.सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आनंददायी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमातंर्गत विद्यार्थ्यांनी ‘दिपावली मनाए सुहानी’ गीतावर नृत्य केले. या कार्यक्रमामुळे शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आणि विद्यार्थ्यांनी दिवाळी सणाचा खऱ्या अर्थाने आनंद लुटला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना मिष्ठान्नाचे वाटप करण्यात आले.व एकमेकांना पुनश्च दिपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे