ताम्हिणी घाटातील कठडे दुर्लक्षित; शासनाचे दुर्लक्ष
ताम्हिणी घाटातील कठडे दुर्लक्षित; शासनाचे दुर्लक्ष
ताम्हिणी घाटातील कठडे दुर्लक्षित; शासनाचे दुर्लक्ष
नागरिकांच्या जीवाशी खेळखंडोबा
अपघाताची वाट पाहताहेत सरंक्षक कठडे
वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे
पुणे: ताम्हिणी घाटाची भौगोलिक स्थिती ही ४ टप्प्यांमध्ये विभागली आहे ते पुढील प्रमाणे: १) मुळशी धरण आणि त्याचे बॅकवॉटर (२३ किमी): २) ताम्हिणी घाटाचा दुसरा टप्पा (८ किमी): ३) ताम्हिणी घाटाचा तिसरा टप्पा (७ किमी): ४) ताम्हिणी घाटाचा चौथा टप्पा (९ किमी) असे एकूण ४ टप्पे असून सर्वच टप्पे हे सुरक्षित नसल्याचे चित्र आहे.
दि. ५/१/२०२५ ला आमचे कुटुंबीय ताम्हिणी घाटातून येताना काही वळणावर कठडे तुटलेले दिसले. अतिशय डेंजर वळणे आहेत ही. ते वळण पार करताना जीव मुठीत ठेवून जावे लागते अशी माझी अवस्था झाली होती. तर शासनाला एकच विनंती आहे की लवकरात लवकर जे कठडे दुरुस्तीला आले आहेत ते दुरुस्ती करुन घ्यावेत.
ताम्हिणी घाट म्हणजे निसर्ग सौन्दर्य होय. पावसाळ्यात घाटातला नजारा पहायला अनेक पर्यटक जातात. तर या पर्यटकांची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यांच्या जीवाचे रक्षण करावे ही शासनाला नम्र विनंती आहे.