ॲड. दत्ता पाटील लॅा कॅालेजमध्ये विधी साक्षरता शिबीर
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
ॲड. दत्ता पाटील लॅा कॅालेजमध्ये विधी साक्षरता शिबीर
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग: मंगळवार,दि.०७ जानेवारी २०२५ रोजी,सकाळी ११:०० वा.ॲड. दत्ता पाटील लॅा कॅालेज अलिबाग आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड,अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्टीय युवा दिन आणि राष्ट्रीय मानवी तस्करी जाणीव दिनानिमित्त विधी साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग,सचिव मा.ॲड.अमोल शिंदे ,वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधत मार्गदर्शन करताना भारतिय दंड संहिता १८६० आणि भारतीय न्याय संहिता २०२३ यामधील तरतुदींचा फरक समजावून सांगितला.कायद्यांचे अर्थ विशद करताना कायद्यातील प्रत्येक तरतूद आणि त्यात उल्लेख केलेल्या संज्ञा अत्यंत महत्वाच्या असतात असे प्रतिपादन त्यांनी केले.
त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी बदलती समाजव्यवस्था,बदललेले गुन्हयांचे स्वरूप आणि कायद्यांची अंमलबजावणी याविषयी माहिती दिली.आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणारे गुन्हे,गुन्हेगारांचे प्रकार,बालगुन्हेगार आणि त्याविषयीचे कायदे यामध्ये झालेले बदल त्यांनी विशद केले.कायद्यामधील घटनादुरुस्ती भविष्यामध्ये कश्या फायदेशीर ठरू शकतात याबाबत मार्गदर्शन केले.एफ.आय.आर.आणि झिरो एफ.आय.आर. तसेच इलेक्ट्रॅानिक एफ.आय.आर.यामधील फरक सांगून त्याचे महत्व विशद केले.डिजिटल पुरावा आणि फिरेन्सिक पुरावा हा प्रत्येक गुन्हे तपासासाठी अत्यंत महत्वाचा आहे असे सांगून सी.आर.पी.सी.१९७३ आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ यामधील सुधारणांचे उदाहरणासहित विश्लेषण केले.
विद्यार्थ्यांनी विधी शाखेचा अभ्यास करताना आणि सराव करताना कायद्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला त्यांनी दिला.प्रश्नोत्तराच्या सत्रामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. जिल्हा विधी प्राधिकरणाचे सदस्य मा.ॲड.पियुष गडे यांनी मानवी तस्करी विषयावर निगडीत भारतीय कायद्यांची माहिती देताना युवांनी सार्वजनिक भान ठेवत,समाज माध्यमांचा वापर करुन मानवी तस्करी रोखण्यासाठी सहाय्य कसे करता येईल याबाबत माहिती दिली.
भारतामध्ये मानवी तस्करी रोखण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे आणि तरतूदींविषयी माहिती दिली.त्याचबरोबर अवैध मानवी तस्करी कायदा ,बालकामगार कायदा ,पोक्सो कायदा आणि बालविवाह प्रतिबंध कायदा याविषयी मार्गदर्शन केले.
या शिबीराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.ॲड गौतम पाटील, उपाध्यक्ष डॅा.साक्षी पाटील ,सक्रेटरी श्री.गौरव पाटील,लॅा कॅालेजच्या प्रभारी प्राचार्य ॲड.नीलम हजारे आणि आय.क्यु.ए.सी. समन्वयक प्रा.डॅा.संदीप घाडगे यांनी मार्गदर्शन केले.प्रा.निलम म्हात्रे, प्रा.कौशिक बोडस, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य या शिबिरासाठी उपस्थित होते.प्रा.पियुषा पाटील यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. लॅा कॅालेजमधील आय.क्यु.ए.सी.आणि लिगल एड सर्व्हिसेस समितीमार्फत प्रा.चिन्मय राणे यांनी शिबीराचे आयोजन केले.