आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध
माणुसकी नावाचं गाव
भुमेश्वरी सातपुते खोंडे ता. उमरेड जि. नागपूर

0
5
1
6
4
1
माणुसकी नावाचं गाव
धर्मभेदाच्या पलिकडे
असावं एक गाव
माणसं असावित तेथे
‘माणुसकी’ त्याचं नाव ॥१॥
धर्म-अधर्माला नको तिथे थारा
मानवतेचा तिथे नित्य वाहो झरा
भांडणतंट्याला नको तिथे वाव ॥२॥
नको कुणी गरीब, नको श्रीमंत,
जातीपातीचा व्हावा तिथे अंत,
प्रेममंत्राचा नित्य राहो ठाव ॥३॥
नको कुणा व्यसनं, नको रोगराई
असावे स्वच्छ पाणी अन् हिरवी वनराई
नको कुणी दुबळा, नको कुणी साव ||४||
भुमेश्वरी सातपुते खोंडे
ता. उमरेड जि. नागपूर
0
5
1
6
4
1



