‘जागतिक महिला दिनी’ वसुधा नाईक यांना काव्य गौरव पुरस्कार
संज्योती पब्लिकेशनतर्फे आयोजित
‘जागतिक महिला दिनी’ वसुधा नाईक यांना काव्य गौरव पुरस्कार
संज्योती पब्लिकेशनतर्फे आयोजित
वसुधा नाईक, पुणे
पुणे: (दि १३): श्री साई प्रतिष्ठान पुणे यांच्यावतीने महिला दिनाचे औचित्य साधून पुणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांना आदर्श महिला पुरस्कार दिले. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स हडपसर येथील सभागृहात हा कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडला यावेळी श्री संजय चौधरी यांच्या तीन प्रतिनिधीक पुस्तकांचे प्रकाशन झाले कवी संमेलन उत्तम पार पडले.
याप्रसंगी वसुधा नाईक, डॉक्टर संगीता भारती,जागृती कुलकर्णी,हर्षा पिसाळ, संगीता शिंदे भाग्यश्री साळुंखे इत्यादी महिलांना पुरस्काराने गौरवण्यात आले. याप्रसंगी बोलताना महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर म्हणाल्या ‘ स्त्रियांनी स्वतःचे अधिकार समजून घेण्यासाठी संविधानाचे वाचन करावे स्त्रियांसाठी असणाऱ्या योजना, कायदे समजून घ्यायला हवेत अबला हा शब्द काढून सबला बनावे. आदिशक्तीचा अवतार ही स्त्री आहे त्याचा प्रत्येक पुरुषाने सन्मान करावा.’
मोटिवेशनल स्पीकर डॉ. दत्ता कोहिनकर यांनी असे सांगितले की “वाचाल तर वाचाल “या उक्तीचा योग्य अर्थ समजून दिला. कौतुकाची थाप पाठीवर पडली असता कार्याची प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते हे छान विविध उदाहरणांनी समजावून दिले. शरीर व मन यांच्या सबलतेसाठी ध्यान धारणा करावे हे ही त्यांनी सांगितले.
या बहारदार कार्यक्रमासाठी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर, पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरू पराग कालेकर, माईंड पॉवर ट्रेनर डॉक्टर दत्ता कोहिनकर, ज्येष्ठ साहित्यिक गौतम कोतवाल, सामाजिक कार्यकर्ते शितल चोडणकर, सरकारी वकील एन डी पाटील, गोवा सांस्कृतिक विभाग प्रमुख दशरथ राव परब, श्री साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय भाऊ चौधरी व डॉक्टर रेखा पौडवाल इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
संतोष इंगळे यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. पवार यांनी आभार मानले. सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ चौधरी व त्यांच्या पूर्ण टीमने उत्तम नियोजन करीत अथक परिश्रम होऊन कार्यक्रम बहारदार सजवला.



