0
4
8
2
9
7
आठवण म्हणून
अवचित अशी आलीस
मन माझे जिंकून गेलीस
अविस्मरणीय आठवण म्हणून
मनात माझ्या राहिलीस
झुळूक तू वाऱ्याची होऊन
आयुष्यात माझ्या आलीस
टाकून प्रेमरंग माझ्या जीवनात
सप्तरंगाची माळ झालीस
नटखट तुझी अदा पाहून
घायाळ मी गेलो होऊन
रूप तुझे ते मनात भरले
फक्त तुझ्यातच गेलो मग्न होऊन
फिर फिरून आठवण तुझीच येते
तू माझा श्वास होऊन राहते
स्पर्श प्रेमाचा देऊन जाते
मन माझे फक्त तुझ्यातच रमत राहते
तुझे दिसणे, स्मित हसणे
मला खुश करून जाते
गोड क्षण आजचा तो
आठवण म्हणून राहते
संजय गायकवाड
छत्रपती संभाजीनगर
=========
0
4
8
2
9
7



