
0
4
0
9
0
3
ग्रंथमैत्री
ग्रंथ ज्ञानाचे सागर,
ग्रंथ सुखाचे आगर,
संकटात देती आधार,
सांगती जीवनाचे सार
ग्रंथांच्या पानांत शब्दरुपे
साकारे विचारांची दुनिया
मौनातही ते शब्द बोलती
ज्ञान देण्याची हो किमया
अज्ञानतम हा पसरला
माणूस दिग्मूढ जाहला
ग्रंथ गुरुची मग धावला
ज्ञानाचा प्रकाश दिधला
अशावेळी ग्रंथमैत्री हीच
मानवासी प्रेरक ठरते
महान लोकांनी हो केली
तीच योग्य मार्ग दावते
ग्रंथांची जाणावी महती,
आयुष्यभर साथ देती,
दु:खाला दूरची करती,
मन:शांतीची वाट दाविती
वृंदा(चित्रा)करमरकर
ता. जि.सांगली
0
4
0
9
0
3





