
0
4
0
9
0
3
अर्धसत्य
एखादे अर्धसत्य जेव्हा
हजार तोंडी घोकू लागते
तथ्य नसलेले थोतांडही
पूर्णसत्यच वाटू लागते…//
शहानिशा करण्याचीही
तसदी कुणास घेवू वाटते?
भूलथापा अन् अफवांनाच
अकारण बळ देवू वाटते.. //
बर्यावाईट परिणामांची
पर्वा कुणाला वाटत नसते
मग प्रसंगाचे गांभीर्य मात्र
आपोआपच घटत असते… //
संशय आणि गैरसमजात
उगाच मन गुरफटत जाते
शांत स्थिर जीवन सुद्धा
दिशाहीन भरकटत रहाते.. //
सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ
सत्य शिवाहून सुंदर असते
परिस्थितीनुसार बदलणारे
असत्यासारखे बिलंदर नसते.. //
विष्णू संकपाळ बजाजनगर
जि.छ. संभाजीनगर
=======
0
4
0
9
0
3





