आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशनागपूरविदर्भसाहित्यगंध
“टीम इंडिया अंतिम फेरीत”: ‘डॅा अनिल पावशेकर’
अगं बाई....अरेच्चा....!!!
0
4
8
2
9
0
“टीम इंडिया अंतिम फेरीत”: ‘डॅा अनिल पावशेकर’
अगं बाई….अरेच्चा….!!!
२०२३ विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभवाचा टीम इंडियाने तब्बल दिड वर्षांनंतर कांगारूंचा प्रतिशोध घेतला असून चॅम्पियन्स चषकाच्या अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला आहे. अत्यंत रोमांचक आणि चुरशीच्या लढतीत दोन्ही संघासाठी कभी खुशी कभी गम सारखे प्रसंग आले परंतु दमदार गोलंदाजी आणि भक्कम फलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने बाजी मारली आहे. झेल टिपण्याच्या बाबतीत दोन्ही संघांनी उदारता दाखवली असली तरी आपल्या संघाची गोलंदाजी उजवी असल्याने आपला संघ विजयी ठरला. जसप्रित बुमराहची जेवढी उणीव आपल्याला जाणवली नाही त्याच्या कैकपट उणीव कांगारूंना स्टार्क, कमीन्स आणि हेझलवूडची जाणवली असणार.
https://anilpawshekar.blogspot.com/2025/03/blog-post_5.html
0
4
8
2
9
0



