Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितादादरा नगर हवेलीदेश-विदेशनागपूरपरीक्षण लेखमहाराष्ट्रमुंबईसंपादकीयसाहित्यगंध

“जागृत जनमत केवळ लोकशाहीची शक्ती नसून, प्रबुद्ध समाजाची ओळख”; प्रशांत ठाकरे

शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 6 7 7 9 4

“जागृत जनमत केवळ लोकशाहीची शक्ती नसून, प्रबुद्ध समाजाची ओळख”; प्रशांत ठाकरे

शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे काव्यपरीक्षण

लोकशाही प्रधान असलेल्या आपल्या भारत देशात सर्वाधिक महत्त्व आहे ते जनमताला…!! अर्थात जनमताचा हा कौल केवळ आणि केवळ लोकांच्याच हातात आहे, म्हणून तर एखाद्या गावात सकाळी एक अफवा जन्माला येते दुपारपर्यंत ती बातमी होते आणि संध्याकाळपर्यंत ती गावाचे मत बनते. सत्य मात्र शांत उभे राहिले आपली वेळ येण्याची वाट पाहत! ही केवळ गावाची गोष्ट नाही, तर आजकाल हे आपल्या समाज जीवनाचे वास्तव तयार झाले आहे.

‘जनमत’ म्हणजे केवळ बहुसंख्य लोकांचे मत नव्हे, तर एखाद्या प्रश्नाविषयी समाजाच्या सामूहिक विचारातून निर्माण झालेले भान होय. लोकशाहीची खरी ताकद केवळ मतपेटीत नसते; तर ती जागरूक नागरिकांच्या विवेकात असते. आज समाजमाध्यमांमुळे माहिती क्षणार्धात पसरते. एखादी अफवा, अपूर्ण माहिती किंवा संदर्भहीन विधान सहज जनमताचा भाग बनते. म्हणूनच प्रत्येक माहितीवर विश्वास ठेवण्यापूर्वी एक प्रश्न विचारला पाहिजे“हे खरंच सत्य आहे का?”

एखाद्या विद्यार्थ्याला “हा अभ्यासात कमजोर आहे” असा शिक्का बसतो पण त्याची परिस्थिती समजून घेतल्यावर चित्र बदलते. एखाद्या मुलीला “हे क्षेत्र तिच्यासाठी नाही” असे समाज सांगतो, पण शिक्षण आणि जिद्दीने तीच मुलगी त्या क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करते. अशा वेळी बदलते ते केवळ व्यक्तीचे आयुष्य नाही, समाजाचे जनमत बदलते. राजकारणातही जनमत महत्त्वाचे आहे. निवडणुकीतील भाषणे, आश्वासने आणि प्रचार यांपेक्षा नागरिकांनी धोरणे, कामगिरी आणि उपलब्ध तथ्ये तपासून मत बनवणे ही लोकशाहीची खरी परिपक्वता आहे.

कारण मतदानाचा अधिकार म्हणजे केवळ बोटावरची शाई नाही. तर तो नागरिकाच्या विवेकाची सार्वजनिक साक्ष आहे. जनमत समाज घडवू शकते, पण चुकीचे जनमत समाजाला विभागूही शकते. म्हणूनच अफवांपेक्षा तथ्यांना, द्वेषापेक्षा संवादाला, अंधानुकरणापेक्षा चिकित्सेला, आणि भावनेपेक्षा विवेकाला स्थान देऊया. कारण, गर्दीचा आवाज क्षणभर आकाश दणाणवतो… पण विवेकाचा एक शांत स्वर समाजाची दिशा बदलू शकतो. “जागृत जनमत ही केवळ लोकशाहीची शक्ती नाही; तर ती प्रबुद्ध समाजाची ओळख आहे”.याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे.

जनमताचा नेहमीच आदर करणारे ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी आज ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेसाठी ‘जनमत’ हा विषय देऊन सर्व कवी, कवयित्रींना या सामाजिक विषयावर लिहिण्यास जणू प्रवृत्त केले.सर्वजण खूप सुंदर व्यक्त झालात. तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन. मनस्वी सर्वांना धन्यवाद…!!!

प्रशांत ठाकरे, सिलवासा
मुख्य परीक्षक/ लेखक/ समीक्षक
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 7 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे