0
4
8
3
0
0
झुळझुळ वारा
झुळझुळ वाहे वारा
अंगावरी गोड शहारा
सांग गूज तव मनातले
लोभवी कटाक्ष लाजरा
तुझा साजरा शृंगार
भुलवी मम मनाला
नेत्र तव भावविभोर
भेदतसे मम निग्रहाला
हनुवटीवर गोंदण हसे
रुप तुझे हे बिलोरी
विसरवते मम सीमा
गालीची खळी लाजरी
सांज वेळ ही अशी
वात असा धुंदावला
गंधाळल्या दशदिशा
प्रीत झुला बघ झुलला
नयन तुझे बोलती
तेच आता बोल ना
प्रीतफुला बहरूनी
गूज मनीचे सांग ना
वृंदा(चित्रा)करमरकर
सांगली जिल्हा सांगली
0
4
8
3
0
0



