Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणे

पुण्यातील राजयुवा प्रकाशनाची साहित्यभरारी; सहा पुस्तकांचे प्रकाशन

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

0 6 3 2 1 8

पुण्यातील राजयुवा प्रकाशनाची साहित्यभरारी; सहा पुस्तकांचे प्रकाशन

पुण्यात रंगले राजयोग कवी संमेलन; सहा पुस्तकांचे प्रकाशन

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

पुणे : राजयुवा प्रकाशन आणि काव्ययोग काव्य संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त राजयोग कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या साहित्यिक सोहळ्यात सहा पुस्तकांचे प्रकाशन, बक्षीस वितरण आणि पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस होते. कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून गझलकार बाळासाहेब गिरी उपस्थित होते, तर डॉ. शंकर अडाणी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रमुख उपस्थितीमध्ये बालसाहित्यिका वसुधा नाईक, सायको-सोशल कौन्सेलर सोनाली फडके, बालसाहित्यिका ललिता सबनीस, ज्येष्ठ लेखिका हेमलता गीते आणि पोलीस आयुक्त मोहन जाधव आदी मान्यवर सहभागी झाले होते.

यावेळी कवी भालचंद्र खरळकर
लिखित ‘खिंडवाट’ हा कवितासंग्रह, अर्चना पाटील लिखित ‘संसाराचा गाडा’ हा कथासंग्रह, वसुधा नाईक आणि योगेश हरणे संपादित ‘साहित्यप्रभा’ हा दिवाळी अंक, गौरव पुंडे आणि योगेश हरणे संपादित ‘माणुसकीची सावली’ हा साहित्यसंग्रह, विकास घोणे लिखित ‘शिंपल्यातले मोती’ हा कथासंग्रह तसेच योगेश हरणे संपादित ‘महाराष्ट्राचा लाडका कवी’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी प्रत्येक पुस्तकातील आशयाविषयी सविस्तर विवेचन केले. साहित्य नेमके कसे असावे, त्यात वैचारिकता कशी असावी आणि साहित्याने समाजाला कोणती दिशा द्यावी, याविषयी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारपूर्ण विवेचनातून साहित्यिकांना नवी दृष्टी मिळाली. राजयुवा प्रकाशनाच्या माध्यमातून आतापर्यंत १२५ पुस्तके प्रकाशित झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीराम घाडे, करण सोळसे, राजयुवा प्रकाशनाचे गौरव पुंडे, योगेश हरणे आणि मयुरी लायगुडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे निवेदन गजानन उफाडे यांनी केले. पुस्तक प्रकाशन, वैचारिक मार्गदर्शन आणि काव्य सादरीकरण अशा त्रिवेणी संगमातून राजयोग कवी संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 3 2 1 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे