Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरमहाराष्ट्रमुंबईविदर्भसाहित्यगंध

चला गाऊन तर बघू या..!

वादल वारं सुटलं गो...!!!

0 4 8 2 9 3

चला गाऊन तर बघू या..!

कोळी गीत
वादल वारं सुटलं गो…!!!

वादलवारं सुटलं गो
वाऱ्यानं तुफान उठलं गो
भिरभिर वाऱ्यात पावसाच्या माऱ्यात
सजनानं होडीला पान्यात लोटलं
वादलवारं सुटलं गो !

गडगड ढगांत बिजली करी
फडफड शिडात धडधड उरी
एकली मी आज घरी बाय
संगतीला माझ्या कुनी नाय
सळसळ माडांत खोपीच्या कुडात
जागनाऱ्या डोल्यांत सपान मिटलं
वादलवारं सुटलं गो !

सरसर चालली होडीची नाळ
दूरवर उठली फेसाची माळ
कमरेत जरा वाकुनिया
पान्यामंदी जालं फेकुनिया
नाखवा माजा दर्याचा राजा
लाखाचं धन यानं जाल्यात लुटलं
वादलवारं सुटलं गो !

संकलन: पल्लवी पाटील, नागपूर
गीतकार : शांता शेळके
गायक : लता मंगेशकर
संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे