Breaking
ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रपुणे

शब्द

कवयित्री वसुधा नाईक

0 4 8 2 9 0

शब्द

अशांत आहे मन माझे जरा
शब्दांचा मनी फुलला पिसारा
शब्दांनीच या घात केला
तरी शब्दांचाच पहा तोरा….

अती विचारांचे बाई काहूर
माजले की माझ्याच मनात
सजना साथ देशील का रे मला
सांगू का रे मी तुझ्या कानात….

मनात माजलंय या शब्दांचं
अफाट पसरलंय विस्तृत रान
या शब्दांना जीवनात, जगात
आहे भलताच मान, सन्मान….

शब्द शब्दांशीच कसे आता
भलतेच रुसू फुगू लागलेत
मग काय शब्दांच्या बागेत
टम्म गाल फुगून बसलेत….

रुसवा कसा काढावा
या रुसलेल्या शब्दांचा बरं
शांत करू काय या शब्दांना
लाडीगोडी लावूया तर खरं…..

शब्द पण विचारात पडले
त्यांच्या मनी चलबिचल झाले
बैचैन होऊन सर्व शब्द आता
माझ्याशी गप्पा मारू लागले….

आले रे आले शब्द सजना
आता माझ्या परत भेटीला
हसतील, नाचतील,बागडतील
आनंद देतील माझ्या मनाला…

रुसवा जाईल खरे शब्दांचा
बागेतही रमायला लागतील
माझ्या मनाच्या हिंदोळ्यावर
मनसोक्त खेळत राहतील….

वसुधा वैभव नाईक, पुणे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे