Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरविदर्भसाहित्यगंध

हर्षवलय

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर

0 4 8 2 9 7

हर्षवलय

रोखायचा आहे मला
तुझ्यातला अश्रू प्रलय
खुलवायचे आहे तुझ्या
चेहर्‍यावरती हर्षवलय.. //

झटकून टाक मनातून
गर्द नैराश्य तमाचे भय
निश्चित असतोच येथे
अस्तामागे लख्ख उदय.. //

तीव्र अग्नी ज्वालांनी
दुग्ध जसे उकळतय
शित जल सिंचनाने
तेच हळूहळू निवळतय.. //

असेच माझे शब्दजल
बघ तुझ्यावर बरसतय
निवेल तुझे दग्ध मन
जे व्याकुळ तरसतय.. //

ग्रीष्मरूपी तप्त झळ
तुझे तन मन साहतय
माझे शब्द श्रावणसर
तुजसाठी होवू पाहतय.. //

विष्णू संकपाळ बजाजनगर
छ. संभाजीनगर
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे