
0
4
8
3
0
1
देश माझा स्वप्नातला
आसमंती फडकतो
तिरंगा माझ्या देशाचा
आहे तो देशाची शान
प्रतिक हा वैभवाचा
देश माझा स्वप्नातला
गाठतो यश शिखर
विकास नी प्रगतीत
होईल स्वप्न साकार
रसायन हे अजब
देश होईल महान
अन् खुपच सुंदर
सर्वांनाच अभिमान
गरीब आणि श्रीमंत
अठरा पगड जाती
सुखानंद नांदतात
सलोख्याची सारी नाती
जातीभेद आणि धर्मभेदाचेही
पालन कुणी कधीच ना करावे
प्रेमानी सर्वांशी जिंकून सदैव
मानवतावादी धर्म पाळावे.
अर्चना राजू ईंकने
लाखांदूर भंडारा
0
4
8
3
0
1



