Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनदादरा नगर हवेलीनागपूरसाहित्यगंध

शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेतील काव्यरचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 8 6

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*☄विषय : सत्तामेव जयते☄*
*🍂शनिवार : २३ / ०१/२०२६*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*खालील विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक २०२ साठी आजच साहित्य पाठवावे. वाचून झाले की पाठवा साहित्य*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*’सत्ता’मेव जयते*

सत्ता पिपासू वृत्ती झालीय
लालसा लागली उपभोगाची
साम, दाम, दंड, भेद प्रसंगी
काहीही करून मिळवायची

सत्तेचा भत्ता खाण्यासाठी
आसुरले सत्तेत जाण्यासाठी
कोणाची युती महायुती होई
सर्व काही चाले स्वार्थासाठी

पक्षांतर करून सोई नुसार
साधून घेतील आपला डाव
राजकारणी भले चतुर मोठे
लागू देईनात अंतरीचा ठाव

आपल्याच हातात पूर्वापार
सत्ता चालत राहावी म्हणून
वंशज ऊभे करून स्वतःचे
घराणेशाही आनी निवडून

युती कराय इथं समविचारी
पक्षाची गरज मुळीच नाही
‘सत्ता’मेव जयते ब्रीद वाक्य
यांची एकमुखी गर्जना राही

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️〽️✍️➿➿➿➿
*सत्तामेव जयते*

सत्यमेव जयते,असे उच्चारापुरते,
सत्ता ही सत्याला,पुरूनिया उरते…
सत्तेपुढे सत्याची,ठरे किंमत शून्य,
सत्तेच्या व्यवस्थेत,सत्य हरवले दूर ते…१

असत्याचा बोलबाला, सत्याच्या मुखी टाळा,
ज्यांच्या हातात सत्ता,तोचि हाकली गाडा…
धर्म जाती पंथात, पाजून विषाचा प्याला,
साधूचा वेषधारी,लावी विभूती कपाळा…२

मनाप्रमाणे वागणे,भोळ्या लोकां नागणे,
कष्टकरी जनतेच्या,हाती काही न लागणे…
कायदे असे मुठीत, तिजोरी जाई लुटीत,
गलेलठ्ठ संपत्ती,तरी शौक नाही भागणे…३

सत्ता हिच बोलते, सत्ता हिच चालते,
जनतेची संपत्ती, नको तिथे उधळते…
*सुधाकरा* सत्तेची,तुती बोलू लागते,
म्हणूनच म्हणा लागे,*सत्तामेव जयते*…४

*सुधाकर भगवानजी भुरके*
*आर्य नगर नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️〽️✍️➿➿➿➿
*’सत्ता’ मेव जयते*

लोकशाही आजची हुकूमशाही वाटते।
सत्ता मेव जयते ,पुढार्या मध्ये चालते।।

भगवा निळा हिरवा धारती पांढरा रंग।
सरड्यासम प्रव्रुती दावती न्यारेच ढंग।

पक्षनिष्टा नाहीच फक्त सोंगाडेच भासतो।
सत्ता लालसेपोटी मग खेटरांना चाटतो।।

गरीबी हटवायचे ,देई मोठी मोठी भाषणे।
निवडणूक संपली की,खोटेच आश्वासने।।

मजूरदार शेतकर्यानी टांगला आहे जीव।
या नेत्यांना तरीही,मुळीच कदर ना किव।।

मालामाल होऊन,करती जयजयकार।
रोज रोज बदले यांचा पोटाचा आकार।।

मानवतेची यांना अजिबात नाही जाण।
खुर्चीवर बसून घेई लोकशाहीचा प्राण।।

भ्रष्टाचाराने भोळी जनता भरडत आहे।
माय भारती आवेगाने,अंतरी रडत आहे।।

*गोवर्धन तेलंग*
*पांढरकवडा.जि यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️〽️✍️➿➿➿➿
*”सत्ता” मेव जयते*

झाले सत्तापिपासू सारे पुढारी
चाललाय पैशाचा खेळ सारा
जनमतांचा कौल झुगारून
गाजे ‘सत्ता’ मेव जयतेचा नारा

पांढरंपेशा पुढाऱ्यांना
सत्तेचा फारच लळा
जो बोलतो सत्य वचन
त्याचा दाबला जातोय गळा

जनतेच्या भरोशावर नेत्यांचे
ऐशोआरामात जीवन
लाचार जनता, कार्यकर्ते
फिरतात मागे मागे वणवण

भांडण, वाद, मतभेद सारे
विसरतात सत्तेसाठी
सत्ता मेव जयते अवघे
डाव सारे खुर्चीसाठी.

*सौ. इंदू मुडे, ब्रम्हपुरी /चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️〽️✍️➿➿➿➿
*’सत्ता’ मेव जयते*

सत्तेची ताकत अचाट
सर्व सामान्य जनता अफाट
सत्ताधाऱ्यांच चालतं
जनतेचं ह्रदय फाटतं

सत्तेच्या जोरावरती
आपलं घर भरती
गाडी,घोडा बंगला
अफाट संपत्ती जमवती

समाज सेवेचा दिखावा
नेता म्हणूनी मिरवती
मेल्याच्या टाळू वरती
लोणी आपणच खाती

सत्तेच्या दंबा खाली
दुबळ्यांना शोषून घेता
अन्यायाला उठवी आवाज
त्यालाच तुडवून धरता

जन समस्येवर पाणी
तुम्ही फिरवून देता
‘सत्ता’ मेव जयते
जय घोष करून घेता

*श्री.पुरुषोत्तम ठोंबरे*
*बंधुनगर, झिंगाबाई टाकळी, नागपूर*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️〽️✍️➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*’सत्ता ‘ मेव जयते*

सत्य मेव जयतेचा नारा
निभावणे अवघड असे जीवनी
सत्ता मेव जयते लालचीपणा
समाजावर चालते तयांची मनमानी

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️〽️✍️➿➿➿➿
*’सत्ता ‘ मेव जयते*

जनतेची दिशाभूल करून
खोटी आश्वासने दिली
‘सत्ता ‘ मेव जयते तेच
ज्यांनी मतं विकत घेतली

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️〽️✍️➿➿➿➿
*सत्ता मेव जयते*

सत्तेची भूक
असते लालसा
करते मूक
वाटतो दिलासा ॥१॥

ताकद अचाट
असतो थाट
लावते वाट
पकडतो खाट ॥२॥

सत्ता मेव जयते
मिळवतो मत्ता
नियत फिरते
होतो त्याचा गुत्ता ॥३॥

बसतो विळखा
पाघळतो नवखा
होतो सत्तेला पारखा
भविष्य आपले निरखा॥४॥

सत्तेची लढाई
मारतात बढाई
सत्तेसाठी घाई
करतात सरबराई॥५॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️〽️✍️➿➿➿➿
*’सत्ता’मेव जयते*

म्हणावे हे राजकारण
कि भ्रष्टाचाराचे कुरण
सत्तेसाठी चालते येथे
नित्यची लांगुलचालन

खुर्चीवर ठेवून डोळा
उमेदवार होती गोळा
हौसे आणि नवशांचा
निवडणुकीत भरे मेळा

खुर्चीसाठीच आटापिटा
नाटक करती जनसेवेचे
नीतिमत्तेची लावती बोली
वावडे यांना देशसेवेचे

*’सत्ता’मेव* जयते यांनी
ब्रीदवाक्यची ठरवले
घोडेबाजार इथे भरला
उमेदवार जाती विकले

भ्रष्टाचाराला ऊत आला
जनतेची जीव घुसमटला
महागाईने कहरच केला
नेत्यांचाच फायदा झाला

नीतिमत्ता आता पायदळी
राजकारण झाला आखाडा
जनहिताची हो ऐशीतैशी
सत्तेसाठी होतसे बखेडा

तापल्या तव्यावर भाजती
नेते तर पोळीच आपली
देशहित खुंटीला टांगले
सत्ताधाऱ्यांची तुंबडी भरली

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️〽️✍️➿➿➿➿
*’सत्ता’ मेव जयते*

आजकाल राजकारणात, सत्याला नसे थारा
आता ‘सत्ता’ मेव जयते, हाच एकमेव नारा//

एकनिष्ठ, तत्त्वनिष्ठ, लोप पावली विचारधारा
ज्याला त्याला हवा आहे, फक्त सत्तेचा उबारा.//

कार्यकर्ता फिरतोय इथे, पायी बांधून भोवरा
खुर्चीपर्यंत नेत्यांचीच, पोरं,पोरी,सगा,सोयरा.//

काल वैरी आज कैवारी, सावळा गोंधळ सारा
जनता पडे संभ्रमात, दिशा बदलून वाहे वारा. //

साम, दाम, दंड,भेद, फोडा आणि राज्य करा
नितिमत्ता चुलीत घालून, सत्तेचाच मार्ग धरा.//

जनमताच्या कौलाचेही, वाजवलेत तीन तेरा
दलबदलू दळभद्रींचा, युत्यांचा आलाय फेरा.//

लोकशाहीचा तारणहार, तूच आहेस मतदारा
भ्रष्ट, दुष्ट, घराणेशाहीचा, तूच कर रे निपटारा.//

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️〽️✍️➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे