आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितापरभणीमराठवाडासाहित्यगंध
तू तिथं मी अतूट नाते
संग्राम कुमठेकर ता. जिल्हा लातूर

0
5
1
8
0
1
तू तिथं मी अतूट नाते
भ्रष्टाचार म्हणे दुराचाराला
तू तिथं मी हे अतूटच नाते
भ्रष्टाचाराचा पैसा येता हाती
दुराचाराला कळेनात नाती
नात्यालाही कलंक लावतोय
दुराचारी हा कसा वाचतोय
भ्रष्टाचाराचा पैसा ओततो
पैशाच्या तालावर कोण नाचतो
भ्रष्टाचारातून दुराचार वाढतो
माणुसकीला मातीतच गाढतो
भ्रष्टाचार दुराचार भोजनभाऊ
बोकेसंन्याशी खरंच ऐतखाऊ
भ्रष्टाचाराला आणू या आळा
दुराचारी कसा करेल चाळा
संवैधानिक मार्गाने चालू या
भ्रष्टाचारालाच मातीत घालू या
तू तिथं मी हे म्हणतील कसे
भ्रष्टनीतीचेच होईल रे हसे
दिसतंय तसं जग नसतंय
बिचारा कसा मृगजळी फसतंय
संग्राम कुमठेकर
ता. जिल्हा लातूर
0
5
1
8
0
1



