समुद्रपूरच्या प्रसिद्ध ‘सक्करबावली’ येथे रमजान ईद उत्साहात साजरी
प्रतिनिधी, अखिल रोडे

समुद्रपूरच्या प्रसिद्ध ‘सक्करबावली’ येथे रमजान ईद उत्साहात साजरी
सुन्नी फरीदा मज्जिदमध्ये रात्रभर इबादत आणि देशासाठी दुवा
प्रतिनिधी, अखिल रोडे
बिनधास्त न्यूज नेटवर्क
वर्धा / सक्करबावली : (दि २१) पवित्र रमजान महिन्याची सांगता सक्करबावली परिसरात अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात करण्यात आली. शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी रमजान ईदनिमित्त येथील सुन्नी फरीदा मज्जिद मध्ये मुस्लिम बांधवांनी एकत्र येत रात्रभर जागून नमाज पठण केले आणि अल्लाहची विशेष उपासना (इबादत) केली.
शांततेचा संदेश आणि देशासाठी प्रार्थना
या प्रसंगी मौलाना हाफिज अक्तर कादरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणातून त्यांनी शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश दिला. केवळ वैयक्तिक प्रगतीसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशात सुख-शांती नांदो आणि देशाची प्रगती व्हावी, यासाठी विशेष ‘दुवा’ मागण्यात आली. यावेळी मज्जिद परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाचे आयोजन आणि व्यवस्थापन अध्यक्ष महफुज शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. ईदच्या या पवित्र मुहूर्तावर समाजातील सर्व स्तरांतील नागरिक एकत्र आले होते. कार्यक्रमाला साहिल अली, हसन शेख, रासू शेख, जुनेद शेख, मोसिन सिद्दिगी, ऐफाज सैयद, जिशान अली, शारुख शेख, अनवर शेख, वसीम सिद्दीगी, राहील शेख, सद्दाम शेख, जानू शेख, फैजान शेख आणि अरमान अली, ज़िशान काझी, हासिम शेख, इर्शाद शेख, ताहेर अली यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.
खीर-खुर्मा वाटपाने वाढला गोडवा
नमाज आणि इबादत पूर्ण झाल्यानंतर उपस्थित भाविकांसाठी खीर-खुर्मा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत आणि गोड पदार्थाचा आस्वाद घेत सर्वांनी हा सण मोठ्या आनंदात साजरा केला. सक्करबावली परिसरात या निमित्ताने हिंदू-मुस्लिम ऐक्याचे आणि सलोख्याचे दर्शन घडले.



