कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
नागपूजा; संग्राम कुमठेकर
0
4
8
3
0
0
नागपूजा
नागवंशीय बंधु-भगिनी
नागपंचमीस होती गोळा
नागपूजा रे करण्यापूर्वी
इतिहासावर फिरवा डोळा
अनंतराजा म्हणजे शेषनाग
नागवंशीय कर्तृत्ववान राजा
इतिहास जाणून येईल जाग
कोण सांगतोय रे दूध पाजा ?
वासुकी दयावान नागराजा
मानवी कल्याणाची रे आस
जनकल्याणार्थ हा झिजला
नागसंस्कृतीशी जुळवून रास
नागराजा तक्षक रे पराक्रमी
शौर्यगाथा झाल्या रे नामशेष
हितरक्षक होता रे जनतेचा
उत्खननात सापडेल रे विशेष
नागराजे रे कर्कोटक,ऐरावत
पाच नागराजांचा घ्या रे शोध
नागपूर नागांची भूमी रे थोर
संस्कृती रक्षणार्थ घ्यावा बोध
संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
=========
0
4
8
3
0
0



