स्वराज्य रक्षणाचा धावा करणारा: छावा
अनिता व्यवहारे

स्वराज्य रक्षणाचा धावा करणारा: छावा
मन के जीते जीत हैं |
मन के हारे हार|
हार गये जो बिन लडे|
उन पर है धिक्कार||
प्रत्येक मराठी माणसाला अभिमानाचा हुंदका देणारा ‘छावा*’ चित्रपट नुकताच बघितला. छत्रपती संभाजी राजांच्या बलिदानाची आणि शौर्याची गाथा सांगणारा हा चित्रपट. चित्रपटातील प्रत्येक डायलॉग हा प्रत्येक मराठी माणसाच्या नुसत्या हृदयाला जाऊन भिडतो असं नाही तर काळीज फाडून चिरचिर करतो. ‘शिवाजी सावंत’ लिखित कादंबरीवर आधारित असलेला लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा सिनेमा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असलेल्या विकी कौशल यांनी या भूमिकेसाठी जणू समर्पणच केले आहे साक्षात शंभूराजे त्यांनी स्वतःमध्ये भिनवले आहेत. संभाजी राजांची पत्नी सखी महाराणी येसूबाईच्या भूमिकेतील रश्मीका मंदाना यांची ही भूमिका असेल किंवा संगमेश्वराच्या लढाईत हंबीररावसारखा खंबीर मामा असता तर नक्कीच दुःखद प्रसंगातून वाचला असता छावा.अशा छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी राजांचे स्वामीभक्त हंबीरावांच्या भूमिकेतून आशुतोष राणा, औरंगजेबाच्या भूमिकेत असलेले स्टार अक्षय खन्ना हे ही प्रेक्षकांच्या लक्षात राहतील. एकूणच मराठी कलाकारांची मांदियाळी देखील या सिनेमात छोट्या छोट्या पात्रांमध्ये भाव खाऊन गेली आहे.
हाथी घोडे तोफ तलवार
फौज तेरी सारी है
पर जंजिरो मे जकडा मेरा राजा
आज भी सब पे भारी है |
विनीत कुमार यांनी साकारलेली कवी कलश यांची भूमिका ही तितकीच उठावदार वाटते. संभाजी महाराज हे केवळ राजाच नव्हे तर पती, पिता पुत्र, या भूमिकेबरोबरच साहित्य आणि कलेचे हे उपासक होते. कवी कलश यांच्याबरोबर नेहमी नेहमीच त्यांचे काव्यात्मक संवाद त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख साकारणारे वाटतात.मृत्यूच्या महा मंदिरापर्यंत संभाजीराजांची पाठराखण करणारे कवी कलश यांच्या
“जा रहे है आपके शत्रु की चोट पर लगने,
हमने कहा था हम नमक है महाराज..”
यातली स्वामी भक्ती पाहून संभाजी राजांनी त्यावर दिलेलं उत्तर
“नमक नही तुम चंदन हो कवि
तुम तिलक हो हमारे माथे का”
ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी तरळतं. हृदय पाझरतं अवघ्या नऊ वर्षाची कारकीर्द, त्यात 125 लढाया आणि त्या प्रत्येक लढाईत वेगवेगळ्या कलृपत्या त्करीत उभी केलेली यशोगाथा.. शाळेमध्ये इतिहास शिकताना फारशी अवगत झाली नव्हती. आज असं वाटतं की या वीर पराक्रमी संभाजी महाराजांवर शालेय इतिहासाच्या पुस्तकांनी देखील अन्याय केला असावा. त्यामुळे या पराक्रमी इतिहासाची देवाण-घेवाण झाली ती पुढे विश्वास पाटील पाटील यांचे संभाजी व शिवाजी सावंत यांचा छावा वाचूनच.
पण हे देखील अगदी थोडक्याचं लोकांना.आज या चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातलाच नव्हे तर संपूर्ण भारतातल्या पिढीला हा इतिहास समजला. स्वराज्यावर प्रेम कसे करावे याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे हाच तो छावा.प्रत्येकाने पुन्हा पुन्हा पहावा
अगदी लहान वयातच मातृत्वाचे छत्र हरपलेले बाळ शंभूराजे..जेव्हा
आ ssईssसाssहेssब आsईsसाsहेsब ..
म्हणून टाहो फोडतात आणि त्याला जी शंभू…. म्हणून शिवाजी महाराज त्याला प्रत्युत्तर देतात.. आणि पुन्हा
आsबाsसाsहेब… ये धुऑ कब खत्म होगा आबासाहेब, जब तक स्वराज की आग जलती रहेगी ये धुऑ भी उडता रहेगा शंभू. हा मर्मभेदी टाहो तर प्रत्येक मातृत्वालाच नव्हे तर चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येक हृदयातील ममता मातृत्वाला विदीर्ण करून गेला असावा. हाच बाळ जेव्हा मोठा होतो तेव्हा त्या रडवेल्या स्वरातून जेव्हा..
“फाड देंगे मुघल सल्तनत की छाती,
अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जरूरत की”
‘शेर नही रहा लेकिन छावा अभी जंगल मे घूम रहा है’, असे उद्गार बाहेर पडतात तेव्हा आपला उर अभिमानाने भरून येतो. पण जेव्हा औरंगजेबाची मुलगी देखील संभाजी राजांचं हे रूप पाहून त्यांच्या अंतानंतर
“संभा अपनी मौत का जश्न मनाकर चला गया
और हमे छोड गया अपने जिंदगी का मातम मनाने’
असं वक्तव्य करते तेव्हा या स्वाभिमानाच्या पराक्रमाला वंदन करण्यासाठी हात जोडले जातात. 32 वर्षाचे आयुष्य लाभलेल्या संभाजी राजांना अजून आयुष्य लाभले असते तर स्वराज्याचा इतिहास अजून वेगळं काही घडवून गेला असता. पण छत्रपती शिवाजी महाराज असो की संभाजी महाराज अशा कर्तृत्ववान राजाच्या आयुष्याची दोरी परमेश्वरांना इतकी आखूड का केली असाच प्रश्न पडतो
चित्रपटातील शेवटचा अर्धा तास पाहताना छातीवर दगड ठेवून तो पहावा लागतो इतकी कृरता मुघलांच्यात कोठून आली असावी? असा प्रश्न पडतो संभाजी राजांना कैद करून त्यांच्यावर केलेल्या त्या क्रूर वारांची कल्पना सुद्धा आपण करू शकणार नाही. आणि अशा प्रसंगी ही हासत हासत मृत्यूला सामोरे जाणारा राजा आणि असंख्य वेदना जाणूनही चेहऱ्यावर हसू आणि मुखातून आलेले जगदंब हे शब्द मनाला स्तब्ध पुतळ्याप्रमाणे स्थिर करून जातात.
‘मौत के घुंगरू पहन के नाचते है हम औरंग’
हमारी मौत मराठों के हर घर हर एक नया शिवा, एक नया संभा पैदा करेंगी
लेकिन जब तू मरेगा तब ये तेरी मुघल सल्तनत भी मर जायेगी |’
असं म्हणते..तेव्हा, ‘अवघी तरुणाई रडली पाहून गाथा तुमच्या शौर्याची’ विस्तारली प्रथा राज्यात तुमच्या बलिदान आणि त्यागाची’. या शौर्याचे आणि पराक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी पालकांनी प्रत्येक घरातल्या प्रत्येक छोट्या मुलाला हा चित्रपट दाखवावा असं वाटतं.
अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहिल्यानगर





