Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशनागपूरपरीक्षण लेखविदर्भसाहित्यगंध

इंडोनेशिया, बाली प्रवास भाग 3

कुसुमलता दिलीप वाकडे

0 4 8 2 8 4

इंडोनेशिया, बाली प्रवास भाग 3

दिनांक 9 ऑगस्ट ला आमचा संपूर्ण गुप्र ‘मनाशा हिल’ या ठिकाणी गेल्यावर तेथील मिनी कार चे ड्रायवर आपणास येथील सिंटीचा एक फेरफटका मारून आणतात यात वेगळाच आनंद उदभवयास मिळतो. लाल, आकाशी, पांढरेशुभ्र, कथी पिवळी, निळी अश्या विविध रंगाच्या ओपन मिनी एका कार मध्ये चार प्रवासी बसलोय आम्ही आठ कार केल्यात यात गाव, घरे, शेती, हाॅटेल चालू असलेल्या कारमध्ये फेरफटका मारत असलेला व्हिडीओ काढण्यात आला. त्यानंतर एका मोठया मोकळया मैदानात आठही कार एका रंगेत उभे करून गाडीत, ड्रायव्हिंग सिट,बाजुला उभे ,फुगे पकडून तर कधी आकाशात फुगे सोडत सुंदर फोटो,व्हिडिओ काढण्यात आलेत.

‘काॅफी सेंटर’ येथे दोन तीन ठिकाणी पिंजर्‍यात खवल्या मांजर बांधलेले होते, पुढे गेल्यावर एक म्हातारी खलबत्त्यात काॅफी पावडर बारीक करत होती, तर एक म्हातारी बिया भाजत होती.पुढे एका तरूण मुलीने काॅफी तयार करण्याची संपूर्ण कृती सांगितली.एका विशिष्ट वनस्पतीच्या बिया या खवल्या मांजरीला खायला दिले जाते.त्यानंतर त्याच्या विष्ठेतून बाहेर पडलेल्या बियांना धुवून स्वच्छ करतात त्यानंतर बियांना फोडतात, त्यानंतर चुलीवर मोठया कढईत भाजले जाते. त्यानंतर शेवटी पावडर केले जाते. बारा प्रकारचे आम्हास काॅफी व चहा टेस्ट करण्यास तयार करून दिला.बारा कपात चहा काॅफी आतुन प्रत्येकास चव घेण्यास एक चमचा दिला यात जिंजर टी, लेमन टी, इत्यादी प्रकार होते.

दहा तारखेला विमान सायंकाळी 7.20 मिनिटांनी असल्यामुळे अमरिश हाॅटेलच्या बाजूलाच मार्केट होते. शाॅपिंग करण्यास गुप्र गुप्र मध्ये जाऊन आलोत नंतर विमानतळावर जाण्याकरीता 2 वाजता हाॅटेल सोडले. हाॅटेल पासुन विमानतळावर जायला 2 तास लागलीत. दुपारचे जेवण रस्त्यात आयोजकांनी बुक केलेल्या ठिकाणी केलेत. योगकर्ता विमानतळावर 5 वाजता पोहोचलोत. 7.20 मिनिटांनी लाॅयन एअरलाईन्स च्या विमानाने उड्डाण घेतले बाली दिप ला रात्री 10.43 ला पोहचलोत.

बाली विमानतळावर इंग्रजीत द लास्ट पाॅराटाईज इन द वर्ड (दुनिया का आखरी स्वर्ग) असे लिहिलेलं होत.आम्हाला घेण्यास एक ट्रँव्हल्स बस आली रस्त्यात जेवण करून आम्ही स्वीस बेल एक्सप्रेस लिगान कुटा बाली येथील हाॅटेल मध्ये पोहचलोत. 11 तारखेला सकाळी तयारी,नाश्ता याच हाॅटेलमध्ये करून तिथे पूर्वीच आरक्षित केलेल्या बसमध्ये बसताच बाली प्रवास तीन दिवसकरीता केलेला एक गाईड बसमध्ये चढला. सर्व प्रथम आज आपण तनजुम बेन बीच, बंरगोल टेल बीच,गरूड टेम्पल बघणार असे सांगितले. तनजुम बीचवर आम्ही बनाना बोट, सुबा डायव्हिंग, बाॅटम बोट केलेत. बंरगोल टेल बीच वर जाण्याकरीता एका बोटीत आठ व्यक्ती बसून बीचला संपूर्ण एक वेढा घातला.

बीचच्या त्या किनार्‍यावर उतरून रेतीवर थोडे चालत जात जलचर प्राणी संग्रहालयात गेलोत तिथे लहान मोठे कासव होते तेथील लेडीज गाईडनी इथे 70 वर्षांचा एकच नर कासव आहे. व बाकी सर्व मादी कासव आहेत. नराची शेपुट लहान तर मादीची शेपुट मोठी असते. असली कासव भरपूर होती नकली कासवासोबत फोटो काढण्यात आलीत. गाईड मुलीच्या मदतीने खरोखरच्या मोठया सापासोबत प्रत्येकांनी फोटो काढलेत. परत याच बोटीने बस उभी असलेल्या साईडला सोडून दिले. गरूड टेम्पल इथे पहाडीच्या मध्य भागी दुरूणचं गरूडावर बसलेली देवीची मूर्ती दिसते. बाली येथे वेळ कसा गेला ते कळलेच नाही बालीला 3.00 वाजले असतील तर भारतीय घड्याळात 12.35 होतात (2.30 तासानी मागे असते ) इकडे जेवणात फिश व भात जास्त असते. (क्रमशः )

कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, नागपूर
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे